शबनम न्युज | चऱ्होली
चऱ्होली येथे महिलेच्या गळ्यातील २५ हजार रुपये किमतीचे एक तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठण जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या अज्ञात आरोपीविरोधात २९ सप्टेंबर २०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना ही २८ सप्टेंबर रोजी घडली. अशी माहिती पिंपरी चिंचवड पोलीस गुन्हे शाखा पथकाने दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या रस्त्याने जात असताना एक काळ्या रंगाची पल्सर मोटरसायकल व एक काळ्या रंगाचा जॅकेट व काळ्या रंगाचा हेल्मेट घातलेल्या अज्ञात आरोपीने द्वारका सोसायटीच्या थोडे पुढे, रॉयल चायनीज समोर,चोविसावाडी, चऱ्होली, ता. हवेली, जि. पुणे येथे फिर्यादीच्या गळ्यातील २५ हजार रुपये किमतीचे एक तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठण जबरदस्तीने हिसकावून नेले. त्याच्या विरोधात दिघी ४२४/२०२२ भा.द.वि.कलम ३९२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेचे पो.उ.प.नि. भंडारे करीत आहेत.