शबनम न्युज | पुणे
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. विक्रम गोखले हे पुणे शहराच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. याबाबतची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनाही डॉक्टरांनी दिली आहे.
विक्रम गोखले यांच्यावर गेल्या पंधरा दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांनी टीव्ही सिरीयल, बॉलीवूड मराठी सिनेमांना अनेक भूमिका गाजवले आहेत. अभिनेते म्हणून त्यांची एक वेगळीच ओळख आहे. मात्र घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकातील अभिनयात संन्यास घेतला आहे.
Advertisement