लोणावळा : कामशेत येथे कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार करून खून केला. ही धक्कादायक घटना रविवार (दि. ८) रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली.
मयूरी दशरथ शिंदे (वय ३८, रा. आहे. कामशेत, ता. मावळ) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती दशरथ विठ्ठल शिंदे (वय ४३, रा. कामशेत) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दशरथ शिंदे याने कौटुंबिक वादाचा राग मनात धरून पत्नीच्याडोक्यात कोयत्याने वार केले. यामध्ये मयूरी शिंदे यांचा झाला. आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयाने १३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली
मृत्यू दरम्यान, घटनास्थळी लोणावळा विभाग सहायक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, पोलिस निरीक्षक संजय जगताप, सहायक पोलिस निरीक्षक आकाश पवार, शुभम चव्हाण यांनी भेट दिली आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक आकाश पवार करत आहेत.