पिंपरी चिंचवड शबनम न्यूज प्रतिनिधी
कसबा विधानसभा मतदारसंघ व चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा भाजपचा सस्पेन्स अखेर संपुष्टात आला आहे
कसबा विधानसभा मतदारसंघातून हेमंत रासने तर चिंचवडमधून अश्विनी जगताप यांना भाजपची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या स्वर्गीय आमदार मुक्ता टिळक व चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर दोन्ही विधानसभा करिता पोटनिवडणूक येत्या 26 फेब्रुवारी रोजी होणार आहे या निवडणुकीकरिता भाजपचे दोन्ही विधानसभा मतदारसंघात उमेदवार कोण हा मोठा सस्पेन्स होता तो आता संपुष्टात आला आहे.
चिंचवड विधानसभा मतदार संघात स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर करून स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांच्या पक्ष निष्ठेला न्याय दिला असल्याचे जगताप कुटुंबीय समर्थकांच्या वतीने सांगण्यात येत आहे.
अश्विनी जगताप आपला उमेदवारी अर्ज सोमवारी दुपारी एक वाजता दाखल करणार असल्याची माहिती आहे.