शबनम न्यूज | पिंपरी
जागतिक महिला दिन सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना, या महिला दिनाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड शहरातील मोरे वस्ती येथील सिद्धेश्वर जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने सर्व महिला भगिनींचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून नारीशक्ती महिला मंचच्या अध्यक्षा सौ. नीलिमा मनोज जरे यांना आमंत्रित करण्यात आले. या कार्यक्रमात सर्व क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात आपल्या भावना व्यक्त करताना सौ नीलिमा जरे यांनी सांगितले की, “आज समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी महिला कार्यरत आहेत. घर चालवण्यापासून ते विमान चालवण्यापर्यंत सर्वच क्षेत्रात महिला कार्यरत आहेत. आपल्या देशाच्या राष्ट्रपती या सुद्धा एक महिला आहेत. त्यामुळे आज महिला पुरुषांपेक्षा कुठेच मागे नाही या जागतिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने महिलांचा करण्यात आलेल्या सन्माना बद्दल सिद्धेश्वर जेष्ठ नागरिक संघाचे आम्ही आभारी आहोत.
या कार्यक्रमाचे निमित्ताने मोरे वस्ती परिसरातील अनेक महिला भगिनी उपस्थित होत्या. सर्व उपस्थितितांचे सिद्धेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने सन्मानित करण्यात आले. तसेच आभार व्यक्त करण्यात आले.