शबनम न्युज | पुणे
पुणे विभागातील 18 लाख 41 हजार 246 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 19 लाख 9 हजार 241 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 28 हजार 654 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 39 हजार 341 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.06 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.44 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 11 लाख 1 हजार 247 रुग्णांपैकी 10 लाख 74 हजार 717 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 8 हजार 101 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 429 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.67 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.59 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 32 हजार 189 रुग्णांपैकी 2 लाख 18 हजार 521 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 15 आहेत. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 653 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 87 हजार 534 रुग्णांपैकी 1 लाख 77 हजार 929 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 903 आहेत. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 702 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 86 हजार 563 रुग्णांपैकी 1 लाख 76 हजार 540 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 110 आहेत. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 913 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 1 हजार 708 रुग्णांपैकी 1 लाख 93 हजार 539 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 525 आहेत. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 644 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 3 हजार 46 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 974, सातारा जिल्ह्यात 652, सोलापूर जिल्ह्यात 783, सांगली जिल्ह्यात 403 तर कोल्हापूर जिल्ह्यात 234 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 3 हजार 823 आहे. पुणे जिल्हयामध्ये 855, सातारा जिल्हयामध्ये 916, सोलापूर जिल्हयामध्ये 810 सांगली जिल्हयामध्ये 761 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 481 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 42 लाख 97 हजार 367 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 19 लाख 9 हजार 241 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.