शबनम न्युज | पिंपरी | पुणे
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील स्थायी समिती सभापती नितीन लांडगे यांच्यासह पाच जणांना काल एसीबी वतीने चौकशीसाठी ताब्यात घेऊन अटक करण्यात आली होती या सर्व आरोपींना आज शिवाजीनगर कोर्टात हजर केल्यानंतर माननीय न्यायालयाने 21 ऑगस्टपर्यंत सर्व आरोपींना पोलिस कोठडी सुनावली आहे आरोपी वतीने एडवोकेट परदेसी यांनी काम पाहिले
स्थायी समितीचे सभापती नितीन लांडगे यांचेसह पाच जणांना काल सायंकाळी महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीतुन अटक करण्यात आली होती त्यानंतर आज त्यांना सकाळी शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर करण्यात आले सर्व आरोपींना 21 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे स्थायी समिती मधील सर्व सदस्यांची चौकशी होणे बाकी आहे याकरिता सदर पोलीस कोठडी वाढविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे
स्थायी समितीचे सभापती नितीन लांडगे यांना ठेकेदाराकडून लाच घेतल्या प्रकरणी चौकशीसाठी काल एसीबीने ताब्यात घेतले होते व चौकशी रात्री उशिरापर्यंत सुरू होती त्यानंतर त्यांना अटक करून आज न्यायालयात हजर करण्यात आले होते
या प्रकरणात चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप व भोसरी विधानसभेचे आमदार तथा भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी हा एक राजकीय षडयंत्र असून सभापती नितीन लांडगे यांना आटकवण्याचा प्रयत्न करण्यात आले असल्याचे सांगितले आहे तसेच लवकरच सत्य समोर येईल न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे असे सांगितले