शबनम न्युज | पिंपरी चिंचवड (वृत्तसंस्था)
पिंपरी चिंचवड शहरातील मोशी व चिखली परिसरातील रिवर रेसिडेन्सी येथील क्रीडांगण महानगरपालिका वतीने आरक्षित केले असतानाही या खेळाच्या मैदानावर हॉर्स रायडिंग साठी मनपा प्रशासन वतीने काम सुरू करण्यात आले आहे . आश्चर्याची बाब म्हणजे स्थानिक प्रतिनिधी व नागरिकांना कोणतीही कल्पना न देता या आरक्षित असलेल्या क्रीडांगण हे प्रशासनाने हॉर्स रायडिंग साठी देऊन नागरिकांची फसवणूक केली असल्याची तक्रार लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून होत आहे. यासाठीच या परिसरातील माजी नगरसेवक वसंत बोराटे यांच्या नेतृत्वात 10 ऑगस्ट रोजी या परिसरातील सोसायटी धारक नागरिक एकत्र येऊन या हॉस्टारडिंग कामाला विरोध करणार आहेत.
याबाबत माहिती देताना माजी नगरसेवक वसंत बोराटे यांनी सांगितले की, मोशी-चिखली परिसरातील सर्व खेळाडूंना आपले आरोग्य सांभाळण्यासाठी व मुलांना खेळासाठी प्रवर्त करण्यासाठी एकच मैदान शिल्लक होते तेही आयुक्ताने स्थानिक नागरिकांना व स्थानिक नेतृत्वांना कोणतीही कल्पना न देता व कुठलीही नोटीस न देता हे ग्राउंड स्थानिक लोकांपासून बलाढ्य लोकांसाठी हॉर्स रायडिंग साठी देण्यात आलेला आहे ही अतिशय दुःखद बातमी आहे.
तरी जवळपासच्या सर्व नागरिकांनी व खेळाडूंनी आता एकत्र येऊन आवाज उठवण्याची गरज आहे नाहीतर जे आपण खेळातून मैत्री जपली नाते जपलो ते आज महानगरपालिका च्या भोंगाळ कारभारामुळे संपुष्टात येण्याची चिन्ह दिसत आहेत. हा जो मनमानी कारभार चालू आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसांना माणूस पण संपुष्टात आणण्याचा प्रयत्न व माणुसकी संपवण्याचा प्रयत्न महानगरपालिकेने चालवलेला आहे.
आसपासच्या परिसरातील जवळपास 500 ते 700 खेळाडू या ग्राउंड वर रोज खेळत असतात वर्षातून अनेक महिने मोठे टूर्नामेंट भरवले जाते व अनेक कर्मणुकीचे मोठे खेळ या ग्राउंड वरती खेळवले जातात त्यामुळे स्थानिक लोकांचे खूप मोठे करमणुकीचे साधन व धावपळीच्या जीवनातून थोडा विसावा या ग्राउंड मध्ये मिळत असतो तोही आज संपवण्याचा पूर्ण प्रयत्न केला गेला आहे.
तरी परिसरातील सर्व नागरिकांनी व खेळाडूंनी आपल्या ग्राउंड मध्ये दि. १० ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता स्थानिक नेतृत्वाला सोबत घेऊन हे जे ग्राउंड वर अतिक्रमण चालू आहे ते बंद पाडण्यासाठी व आम्हाला हक्काचे ग्राउंड परत मिळून घेण्यासाठी एकत्र यायचं आहे आज एकत्र आलो तर उद्या आपला ग्राउंड आपले मैदान शिल्लक राहील अन्यथा या काँक्रिटी जंगलामध्ये कुठलेच आरोग्यासाठी मैदान शिल्लक राहणार नाही.
पालिका प्रशासनाचा भोंगळा कारभार थांबविण्याकरिता रिवर रेसिडेन्सी, ऐश्वर्यम हमारा, आर के एच ब्लेसिंग, ऐश्वर्यम हमारा म्हाडा, ओम साई एवेन्यू ,वास्तू ड्रीम मिलेनियम, वैष्णवी कॉर्नर, गायत्री लेगसी, जी के एस टी ,कनवारम ,आकाशवेध, विष्णू ग्रीन्स या सर्व सोसायट्यांमधील नागरिकांना वसंत बोराटे यांनी आवाहन केले आहे की, 10 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा 11 श्रीराम चौक रेसिडेन्सी येथील क्रीडांगणावर एकत्र यावे तसेच या आरक्षित क्रिडांगणाला वाचवावे, असेही आवाहन वसंत बोर्ड यांनी केले आहे.