शबनम न्यूज , प्रतिनिधी :
मावळ लोकसभा मतदारसंघाचे प्रथम संसद रत्न खासदार स्वर्गीय गजानन बाबर यांना त्यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त श्री गजानन लोकसेवा सहकारी बँक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
श्रद्धांजली अर्पण करताना बँकेचे अध्यक्ष योगेश बाबर यांनी खासदार स्व.गजानन बाबर यांच्या आठवणींना उजाळा देत बाबर ज्या तत्त्वशीलतेने राजकारण तसेच समाजकारणात वावरले तोच मार्ग आम्ही बाबर परिवाराने अवलंबविला आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी बँकेच्या माजी अध्यक्षा माजी नगरसेविका अनुराधा गोरखे , माजी नगरसेवक कुमार जाधव, संचालक भास्कर बोरुडे, व मोहन बाबर यांनी श्रद्धांजलीपर आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी बँकेचे उपाध्यक्ष दिलीप देशमुख, संचालक दिलीप सावंत, अशोक काळभोर ,अमित बाबर, धीरज बाबर ,अमोल निकम ,कृष्णा वाळके, ऍडव्होकेट भाऊसाहेब शिंदे व बँकेचे व्यवस्थापक संजय जोशी यांच्यासह बाबर परिवारातील माजी नगरसेवक प्रकाश बाबर ,माधुरी बाबर ,सुरज बाबर, डॉक्टर मनीषा जाधव सागर धुमाळ, सौ प्रति धुमाळ, व विजय पवार उपस्थित होते.
यावेळी गजानन गवारे, शंकर वाडकर, सुरेश वाडकर ,महेश खराडे, ऋषिकेश वाघेरे, सुरेश मोहिते, दिनेश लिंगवत, लक्ष्मण शिंदे ,राजाभाऊ म्हस्के , सत्यजित बाबर, मधुकर बाबर, समीर धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते.