शबनम न्युज | पुणे
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी जाहीर प्रचाराला सुरुवात केली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी मंगळवारी कसबा विधानसभा मतदारसंघात उद्यानांमध्ये नागरिकांच्या भेटी घेत प्रचार सुरू केला तर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघातील उद्यानांमध्ये भेट देत मतदारांना साकडे घातले आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांनी देखील आपला जाहीर प्रचार सुरू केला आहे.
लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उमेदवारांकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेक भेटी गाठी वर भर देण्यात येत आहे. तसेच आता जाहीर प्रचार देखील करण्यात येत आहे. उमेदवार आता नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत, उद्याने, टेकड्या, सकाळी ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एकत्रित नागरिक भेटतील अशा ठिकाणी जाऊन उमेदवार आपापला प्रचार करीत आहेत.