शबनम न्युज | मुंबई
ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे देण्यात येणारा यंदाचा प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कार महानायक अमिताभ बच्चन यांना जाहीर करण्यात आला आहे तर मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीतकार ए. आर. रहमान, अशोक सराफ, रूप कुमार राठोड, पद्मिनी कोल्हापुरे, भाऊ तोरसेकर, अतुल परचुरे, रणदीप हुडा यांना जाहीर झाला आहे. मंगळवारी या दोन्ही पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
नागपूर येथे झालेल्या सूर ज्योत्सना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळ्यात रूपकुमार राठोड यांचा सूर ज्योत्स्ना आयकॉन इन म्युझिक अवॉर्डने सन्मानित केले होते. सर्व पुरस्कार वर्ष पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या हस्ते प्रदान केले जातील.
Advertisement