शबनम न्यूज | मुंबई
रविवारी कोलकाता नाइट रायडर्सच्या सामन्यादरम्यान चाहत्यांन त्याचे ‘चक दे इंडिया’ या चित्रपटातील त्याचा कबीर खान लुक पुन्हा पाहावयास मिळाला. किंग खान संघाचा सहमालक देखील आहे, तो रविवारी या सामन्यात सहभागी होण्यासाठी कोलकाता येथे पोहोचला. यादरम्यानचा त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. शाहरुखचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख टीम मेंबर्सना चक दे इंडियाचे 70 मिनिटांचे स्पीच देताना दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये शाहरुखने आजच्या खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक केले, तर जुन्या खेळाडूंना त्यांच्या कनिष्ठ खेळाडूंना पाठिंबा देण्याचे आवाहन केले.शाहरुखने त्याच्या व्हिडिओमध्ये पुढे म्हटले आहे की, ‘जेव्हा आम्ही एक संघ म्हणून खेळतो आणि एका व्यक्तीवर नव्हे तर प्रत्येकाच्या विजयावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा ते पाहून छान वाटते. आमचे युवा खेळाडू वरिष्ठ आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंसारखे महान क्रिकेटपटू बनतील हे आम्हाला पहावे लागेल, आमच्या वरिष्ठ खेळाडूंनी युवा खेळाडूंना त्यांच्यासारखे बनण्यासाठी प्रेरणा द्यावी आणि त्यांना प्रत्येक प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, मला वाटते सर्व खेळाडूंचे आभार मानावे. IPL 2024 च्या 28 व्या सामन्यात KKR ने लखनौ सुपरजायंट्सचा 8 विकेटने पराभव केला. केकेआरचा हा 5 सामन्यांमधला चौथा विजय आहे. या विजयासह KKR संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.