शबनम न्यूज | पिंपरी
बेकायदेशीर शस्त्र बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने मंगळवारी (दि. १६) रोजी निगडीतील शंकर मंदिराजवळ ही कारवाई केली. क्रिस्टीफर अलविन सालढाणा (वय 19 , रा. आझाद चौक, निगडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
या प्रकरणी पोलिसांनी अंमलदार उद्धव खेडकर यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिरण्यात दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सालढाणा हा बेकायदेशीर कोयता घेऊन फिरत होता. गुन्हे शाखेला याची माहिती मिळाली, त्यानुसार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्याच्याकडून कोयता जप्त केला.या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Advertisement