शबनम न्युज / नवी मुंबई
कोरोना महामारीच्या अभुतपूर्व संकटातून जनतेला बाहेर काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला झोकून द्यावे, असे आवाहन खासदार शरद पवार यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नवी मुंबईतील पक्ष कार्यालयात भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.
कोरोना महामारीने राज्यात पुन्हा एकदा रौद्र रूप धारण केले आहे. या परिस्थितीत राज्याला रक्ताचा तुटवडा भासू लागला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान शिबीर चे आयोजन केले जात आहे. नवी मुंबईतील या रक्तदान शिबीराला नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.
यावेळी आमदार शशिकांत शिंदे , नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अशोक गावडे, नवी मुंबई जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.