शबनम न्युज / पिंपरी चिंचवड
मागील काही दिवसापासून पिंपरी-चिंचवड शहरातील महात्मा फुले नगर येथे झाडाची फांदी पडून अपघात होत होते. या सर्व पार्श्वभूमीवर या भागातील माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या उद्यान विभागाला धोकादायक असणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी बाबत मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला सकारात्मकपणे प्रतिसाद देत महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत या परिसरातील धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली.
मुख्य उद्यान अधीक्षक प्रकाश गायकवाड यांनी प्रत्यक्ष साईड वर भेट देऊन कामाची पाहणी केली व तातडीने वृक्ष काढणेबाबत कारवाई सुरू केली याबाबतीत क्रेन उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांनी माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांचे आभार व्यक्त केले. व लवकरात लवकर सर्व धोकादायक वृक्ष छाटणी करणे बाबत ठेकेदाराला व कर्मचाऱ्यानां सूचना दिल्या .