पिंपरी : कोरोना आजारावरील रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार करणारी ४ चार जणांची टोळी गजाआड करण्यात आली . पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चार आरोपींना पकडले आहे. त्यांच्याकडून १५ हजार रुपये किमतीचे तीन रेमडेसीवीर इंजेक्शन, रोकड, असा एकूण एक लाख ७४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभाग व अन्न सुरक्षा विभाग यांच्या पथकाने सांगवी येथे शुक्रवारी ९ तारखेला ही कारवाई केली.आदित्य दिगंबर मैदर्गी , प्रताप सुनील जाधवर , अजय गुरुदेव मोराळे , मुरलीधर मुरलीधर मारुटकर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
Advertisement