विभागात कोरोना बाधित 9 लाख 2 हजार 899 रुग्ण – विभागीय आयुक्त सौरभ राव
शबनम न्यूज / पुणे
पुणे विभागातील 7 लाख 63 हजार 250 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 9 लाख 2 हजार 899 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 21 हजार 213 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 18 हजार 333 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.3 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 84.53 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 6 लाख 48 हजार 393 रुग्णांपैकी 5 लाख 39 हजार 430 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 98 हजार 345 आहे. कोरोनाबाधित एकूण 10 हजार 618 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.64 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 83.19 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 73 हजार 332 रुग्णांपैकी 63 हजार 436 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 947 आहेत. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 949 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 71 हजार 225 रुग्णांपैकी 60 हजार 109 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 8 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 108 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 55 हजार 554 रुग्णांपैकी 49 हजार 902 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 806 आहेत. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 846 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 54 हजार 395 रुग्णांपैकी 50 हजार 373 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 210 आहेत. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 812 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 15 हजार 272 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 12 हजार 377, सातारा जिल्ह्यात 854, सोलापूर जिल्ह्यात 1 हजार 187 , सांगली जिल्ह्यात 487 तर कोल्हापूर जिल्ह्यात 367 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 9 हजार 708 आहे. पुणे जिल्हयामध्ये 8 हजार 332, सातारा जिल्हयामध्ये 453, सोलापूर जिल्हयामध्ये 566, सांगली जिल्हयामध्ये 241 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 116 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 55 लाख 98 हजार 553 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 9 लाख 2 हजार 899 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.