- यमुनानगर ठाकरे मैदान लसीकरण केंद्र सुविधा युक्त-भाजप नगरसेवक तथा क्रीडा सभापती प्रा उत्तम केंदळे
- सुविधापूर्ण उभारलेले यमुनानगर लसीकरण केंद्राचा नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा- नगरसेवक व क्रीडा सभापती प्रा उत्तम केंदळे
- नियोजनबद्ध व सुविधा युक्त लसीकरण केंद्र उभारले नागरिकांकडून कौतुक-प्रा उत्तम केंदळे
शबनम न्युज / पिंपरी
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून व भाजप शहर अध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिक व वयाच्या 45 वर्षां पुढील सर्वत्र लसीकरण मोहीम चालू असताना कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने दक्षता घेत आहे, मात्र जेष्ठ नागरिकांसाठी सुरू असलेली लसीकरण मोहिम तळागाळापर्यंत प्रभागात पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न भाजप नगरसेवक व महानगरपालिकेचे क्रीडा सभापती प्रा उत्तम केंदळे व भाजपा प्रभाग क्र 13 च्या वतीने करण्यात येत आहे प्रभागात जनजागृती करताना सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्हिडिओ,फोटो नागरिकांपर्यंत पोहचवून लसीकरण करून घ्यावे अशी जनजागृती प्रभावीपणे आपल्या भागात करत आहेत.तसेच जाहिरात फलक, पत्रके, sms नागरिकांना प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन लसीकरण करून घ्या असे सांगण्यात येत आहे याबाबत त्यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सुरुवातीला लसीकरणाबाबत अनेक गैरसमज समाजात पसरले होते.भीती पसरली होती ही या भीतीपासून दूर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे हे जाणून घेऊन सुरुवातीला सर्वात प्रथम यमुनानगर ठाकरे मैदान येथे लसीकरण केंद्र चालू करावे अशी मागणी आयुक्त यांच्या कडे केली होती त्यांनी मागणी मान्य करून 23 मार्च रोजी प्रत्यक्ष लसीकरण केंद्र चालू केले त्यामध्ये बसण्याची व्यवस्था,सोशल डिस्टशिंग, पाण्याची व्यवस्था,फॅन आदी सुविधा पूरविल्या आहेत तसेच नागरिकांना लसी बाबत काही समस्या आल्यास योग्यप्रकारे मार्गदर्शन करण्यात येते विशेष म्हणजे यमुनानगर मधील साफसफाई कर्मचारी,फेरीवाले,व्यापारी, दुकानदार तसेच चारही शाळातील शिक्षकांना भेटून तसेच संपर्क करून शाळातील शिक्षक,कर्मचारी यांना लसीकरणाचा लाभ दिला
लसीकरण केंद्रावर काम करणारे डॉक्टर,आरोग्य कर्मचारी,कोरोना योद्धे,शिक्षक व इतर सहकारी मित्र परिवार यांची देखील काळजी घेत आहेत.
मागील वीस दिवसातील यमुनानगर ठाकरे मैदान येथील लसीकरण घेणाऱ्याची संख्या वाढत आहे. आज पर्यंत 6000 नागरिकांनी लस घेतली आहे लवकरच 10000 लसीचा टप्पा पार केला जाईल प्रभागातील नागरिकां बरोबर इतर भागातील नागरिक सुद्धा लसीकरण केंद्रात सुविधा असल्याने यमुनानगर येथे लस घेण्यास प्राधान्य देतात असे केंदळे यांनी सांगितले
लसीकरण मोहिमेत सेवा करणारे महापालिकेचे डॉ भोईर मॅडम,डॉ धीरज तायडे, डॉ शैलेश मुळे, डॉ नेहा देशपांडे तसेच आरोग्य कर्मचारी यांच्या समवेत शेखर असरकर, विशाल केंदळे, कौस्तुभ देशपांडे,पंकज कोळी, प्रशांत केंदळे, प्रशांत बाराथे, रुपल माने, प्रशांत तरटे, प्रभू बालचंद्रन यांचेही सहकार्य मिळत असते
तसेच केंद्र चालू करण्यासाठी संमती पालिका आयुक्त राजेश पाटील आणि आमदार महेशदादा लांडगे यांचे ही आभार त्यांनी मानले.तसेच प्रभागातील नगरसेविका सुमनताई पवळे,कमल घोलप व नगरसेवक सचिन चिखले यांचेही सहकार्य असते प्रभागातील ज्या नागरिकांनी लस घेतली नाही त्यांनी लस घ्यावी असे आवाहन प्रा उत्तम केंदळे यांनी केले आहे