शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यमान नगरसेवक, अपक्ष गटनेते कैलास बारणे यांनी स्मशानभूमी बाहेर मर्चुरी रूम बनविण्याबाबत ची मागणी मनपाचे आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.
त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की पिंपरी-चिंचवडमध्ये वाढत्या प्रादुर्भावा मुळे रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. समशान भूमी मध्ये अंत्यसंस्कारासाठी मृत रुग्णास ॲम्बुलन्स मध्ये बराच वेळ थांबावे लागत आहे त्या कारणाने ऍम्ब्युलन्स अडकून पडत आहे त्यामुळे नागरिकांना लवकर ऍम्ब्युलन्स उपलब्ध होत नाही तसेच मृत व्यक्तीचे नातेवाईकांना स्मशानभूमी बाहेर तासंतास ताटकळत बसून राहावे लागते यासाठी स्मशानभूमी बाहेर तात्पुरत्या स्वरूपाचे मर्चुरी रूम बनवावे तेथे मर्चुरी रूम झाल्यास मृतदेह त्या मर्चुरी रूम मध्ये ठेवता येतील त्यामुळे ॲम्बुलन्स ही नागरिकांना लवकरात लवकर उपलब्ध होण्यास मदत होईल व नागरिकांच्या अनेक अडचणी दूर होतील तरी स्मशानभूमी बाहेर मर्चुरी रूम बनविण्यात यावी अशी मागणी नगरसेवक कैलास बारणे यांनी केली आहे.