पुणे -गोविंद गोपाळ गायकवाड यांचे तेरावे वंशज व जीटी पेस्ट कंट्रोल कंपनीचे संचालक व वीर शिदनाक फाउंडेशनचे अध्यक्ष उद्योजक राजेंद्र शंकर गायकवाड हे मूळचे वढू बुद्रुक येथून येथील असून पुण्यामध्ये त्यांची जीटी पेस्ट कंट्रोल कंपनी आहे. या कंपनीचे ते मॅनेजिंग डायरेक्टर होते या कंपनीचा देशाबरोबरच परदेशातही व्यवसाय होता. अतिशय मनमिळावू दिलदार स्वभावाचे व्यक्तिमत्व असलेले राजेंद्र गायकवाड यांना दिनानाथ मंगेशकर रुग्णालय येथे कोरोना वर उपचार घेत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे वयाच्या 58व्या वर्षी त्यांचे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दुःखद निधन झाले.सर्व समाजामध्ये अतिशय तळमळीने कार्यरत असणारे व भीमा कोरेगाव येथील मानवंदना, तसेच वढू येथील गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या स्मारकासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला.तसेच त्यांनी बाबुराव बागुल यांच्या सूड कादंबरीवरील जानकी नाटका ची निर्मिती केली होती.त्यांच्यामागे पत्नी एक मुलगा मुलगी व तीन भाऊ भाऊ एक बहीण असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे सामाजिक, राजकीय , शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक, वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्या अकस्मात मृत्यूमुळे महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रातील लढवय्ये व्यक्तिमत्व हरपले असून सर्व सर्व समाज शोकमग्न झाला आहे.
previous post