पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अंतर्गत पंतप्रधान आवास योजने करिता अर्ज दाखल करतांना पाच हजार रुपये डिपॉझिट नागरिकांनी भरले होते या योजनेत लकी ड्रॉ द्वारे लाभार्थ्यांची नावे जाहीर झाली परंतु ज्या लाभार्थ्यांना या योजनेत लाभ मिळू शकला नाही अशा गरीब नागरिकांचे डिपॉझिट परत करावे अशी मागणी राष्ट्रवादीच्या नगरसेविका स्वाती माई काटे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.
सध्या कोरोना च्या संकटमय काळामध्ये गोरगरीब नागरिकांना पैशाची जास्त अडचण निर्माण झाली आहे ज्या नागरिकांनी या आवास योजनेत पाच हजार रुपये अनामत रक्कम भरली होती ती रक्कम या नागरिकांना परत करावी जेणेकरून या अडचणीच्या काळात या गोरगरीब नागरिकांना दिलासा मिळेल तरी या लाभार्थ्यांचे भरलेले अनामत रक्कम लवकरात लवकर परत द्यावे अशी विनंती राष्ट्रवादीच्या नगरसेविका स्वाती माई काटे यांनी केली आहे.