शबनम न्यूज / पिंपरी
निगडी येथील भक्ती-शक्ती उड्डाणपूल रोटरी व ग्रेड सेपरेटर नागरिकांसाठी लोकार्पण करण्यात यावा अशी मागणी मनसे गट नेते , नगरसेवक सचिन चिखले यांनी मनपा आयुक्त राजेश पाटील यांच्या कडे केली आहे दिलेल्यापत्रात सचिन चिखले यांनी म्हंटले आहे कि निगडी येथील भक्ती शक्ती चौक या ठिकाणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने 2017 साली भक्ती-शक्ती उड्डाणपुलाचे काम चालू करण्यात आले हे काम बी जी शिर्के सद्यस्थितीला करत आहे व उत्कृष्ट दर्जाचे काम चालू आहे 2017 ते 2021 या कालावधीमध्ये भक्ती-शक्ती उडान पुलाचे काम पूर्ण करण्यात आले सद्यस्थितीला काम पूर्ण झालेले आहे.
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून नागरिकांना या कामामुळे वाहतुकीसाठी नाहक त्रास सहन करावा लागला आहे वाहतुकीसाठी नागरिकांना मोठा वळसा घालून आपापल्या ठिकाणी यावे लागत आहे त्यामुळे नागरिकांची मागणी आहे काम पूर्ण झाले असता भक्ती शक्ती उड्डाणपूल रोटरी व ग्रेड सेपरेटर लोकांसाठी खुला करण्यात यावा या नागरिकांची भावना लक्षात घेता व काम चालू असताना नागरिकांनी जे सहकार्य केले असता, नागरिकांचे मनापासनं मी आभार मानत आहे परंतु आता नागरिकांचे रोज फोन येत असून आपण लवकरात लवकर नागरिकांच्या साठी हा रोटरी व ग्रेड सेपरेटर लोकार्पण करण्यात यावा 2020 मागील वर्षी आपण उड्डाणपुलाचे काम पूर्ण करून उद्घाटन घेऊन लोकांसाठी खुला केलेला आहे सद्यस्थितीमध्ये रोटरी व ग्रेट सेपरेटर चे चे काम पूर्ण झालेले आहे, तरी आम्ही आपणास नम्र विनंती करतो की निगडी येथील भक्ती-शक्ती उड्डाणपूल वरील रोटरी व ग्रेड सेपरेटर नागरिकांच्या सोयीसाठी वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा व त्याचे लवकरात लवकर लोकार्पण करण्यात यावे.