जळगाव : जळगाव येथील मयूर काॅलनीत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका दीराने आपल्याच सख्या वहिणीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून तिची हत्या केली असल्याचं उघडकीस आलं आहे. या घटनेनंतर संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतचा तपास केल्यानंतर अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
संबंधित मृत वहिणीचं नाव योगिता सोनार असं आहे. तर आरोपी दीराचं नाव दीपक सोनार असं आहे. दीपक हा 38 वर्षांचा असून त्याने आपल्या वहिणीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून तिची हत्या केली आहे. योगिता यांच्या पतीचा सहा महिन्यांपुर्वी अपघाती मृत्यू झाला होता. मृत झालेल्या योगिता यांच्या पतीचं नाव मुकेश सोनार असं होतं
मुकेश यांच्या मृत्यूच्या 16 दिवसांनंतर मुकेश यांच्या वडीलांचं देखील ह्रदयविकाराने निधन झाले. योगिता यांच्या घरात सतत वाद होत असत.
शुक्रवारी रात्री जेवण झाल्यानंतर दीपक, योगिता यांच्या खोलीत जाऊन मुकेश यांचे काही फाईल्स पाहत होता. यावरुन योगिता आणि दीपक यांच्यात वाद झाला. हा वाद इतका पेटला की दीपकने रागात बेडमागील कुऱ्हाड घेतली आणि योगिता यांच्या डोक्यात घातली. यादरम्यान योगिता यांचा जागीच मृत्यू झाला. हा सर्व प्रकार घडत असताना योगिता यांचा मुलगा घटनास्थळी उपस्थित होता.
दरम्यान, या सर्व प्रकाराची माहिती समोर येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कुऱ्हाड ताब्यात घेतली. तसेच यावेळे योगिता यांच्या मुलाने पोलिसांना हत्येची सर्व माहिती दिली. सुनेच्या मृत्यूनंतर योगिता यांच्या सासू दीपक आणि मुकेश यांच्या आई सुन्न झाल्या होत्या. पोलीस आता प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
प्रतिनिधि
दिलीप सोनकांबळे