शबनम न्यूज / देहू
कोरोना सारखा महाभयंकर आजार पूर्ण देशात पसरत आहे त्याचसोबत डेंग्यू,मलेरिया, टायफड,चिकन गुनिया,असे महाभयंकर आजाराची लक्षणे सर्वत्र दिसून येत आहे यालाच लक्ष्यात घेऊन मावळ विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देहू शहर अध्यक्ष प्रकाश हगवने यांच्या नेतृत्वाखाली तसेच सोशल मीडिया अध्यक्ष अमित घेनंद यांच्या माध्यमातून देहू मधे मोफत निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली.
तसेच प्रभागातील प्रत्येक कुटुंबाला ऑक्सिजन तुळस भेट देखील देण्यात आल्या.अनेक सामाजिक कार्यात सहभागी होऊन जनतेसाठी कार्य करणारा हक्काचा माणूस म्हणून अमित घेनंद जनतेमध्ये सक्रिय आहेत…या प्रसंगी देहू शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष प्रकाश भाऊ हगवने, मा.सभापती हेमलता ताई काळोखे,कामगार सेल महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष योगेश भाऊ जाधव, मा.सरपंच कांतीलाल काळोखे, प्राथमिक आरोग्य केंद्रमुख्याधिकारी डॉ.किशोर यादव,सरचिटणीस शैलेश चव्हाण,युवक अध्यक्ष योगेश मोरे,मिडिया सेल अध्यक्ष अमित घेनंद, मा.युवक अध्यक्ष योगेश परंडवाल, चंद्रकांत भोसले,बाप्पू मुसुडगे,अमोल हगवणे, प्रशांत काळोखे, प्रशांत बेंडभर, विक्रम पाटील,संदीप गार्डे,अजय घायाळ,ऋषिकेश चव्हाण बंटी फुलपगर व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते…