पिंपरी: सासू-सुनेच्या भांडणामध्ये सूनेने सासूचा ब्लाउजच्या सहाय्याने गळा आवळून खून केला. त्यानंतर त्यांचा मृतदेह गोनीत बांधून चार दिवस टेरेसवर ठेवला त्यातून वास यायला लागल्यानंतर तीने पतीच्या मदतीने मृतदेह झुडपात टाकून दिला. ही विदारक घटना तळेगाव दाभाडे येथे शुक्रवारी घडली आणि रविवारी उघडकीस आली.
बेबी गौतम शिंदे (वय ५०), असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर पूजा मिलींद शिंदे (वय २२), मिलींद गौतम शिंदे (वय २९) असे याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या सून व मुलाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेबी आणि त्यांची सून पूजा यांच्यात नेहमीच भांडणे होत होती.
भांडण झाल्यानंतर सासू सुनेच्या भांडणामध्ये सासूने सुनेला व नातवाला मारहाण केली. या रागातून सुनेने ब्लाउजच्या साहाय्याने सासूचा गळा आवळून खून केला. त्यांचा मृतदेह पोत्यात बांधून झुडपात टाकून दिला. याप्रकरणी सुनेसह तिच्या पतीला अटक केली आहे. मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे रविवारी ही धक्कादायक घटना उघडकीस आली.
बेबी गौतम शिंदे (वय ५०), असे खून झालेल्या सासूचे नाव आहे. पूजा मिलींद शिंदे (वय २२), मिलींद गौतम शिंदे (वय २९), असे अटक केलेल्या आरोपी पत्नी व पतीचे नाव आहे. अमित गौतम शिंदे (वय २२, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात रविवारी फिर्याद दिली. याप्रकरणी अमित गौतम शिंदे (वय २२, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात रविवारी फिर्याद दिली.
अमित शिंदे हे त्यांची आई बेबी, भाऊ मिलिंद, वहिनी पूजा तसेच पुतण्या आयुष यांच्यासोबत राहतात. अमित यांची आई बेबी व वहिनी पूजा यांचे घरगुती कारणावरून वाद होत असत. वाद झाल्यानंतर बेबी दोन-दोन दिवस घरातून निघून जात असत. राग शांत झाल्यानंतर त्या परत घरी येत असत. शुक्रवारी बेबी आणि पूजा यांच्यात पुन्हा वाद झाला होता. त्यावेळी पूजा हिने जुन्या ब्लाउजने बेबी यांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्यांचा मृतदेह एका गोणीत भरून इमारतीच्या टेरेसवर ठेवून दिला. सायंकाळी अमित कामावरून घरी आल्यानंतर त्यांनी आईबद्दल विचारणा केली त्यावेळी त्यांच्याशी भांडण झाल्याने त्या पुन्हा घर सोडून गेल्या असल्याचे पूजा यांनी सांगितले. दरम्यान त्यांच्या शेजारच्यांनी टेरेसवरून घाण वास येत असल्याची तक्रार केली होती. त्यामुळे तीन दिवसांनी पूजा हिने तिचा पती मिलिंद याच्यासह मिळून गोणीत बांधलेला मृतदेह जिन्यातून फरफटत खाली आणला व मोकळ्या जागेतील झुडपात टाकला. संपूर्ण जीना घाण झाल्यामुळे दोघांनी जीना धूण्यास सुरवात केली त्याच दरम्यान अमित तेथे आले तुम्ही बिल्डिंगच्या पायऱ्या का धूत आहे, असे अमित यांनी विचारले. त्यावेळी पूजाने घडलेला प्रकार सांगितला. त्यामुळे अमित याने लागलीच पोलिसांत धाव घेतली व दोघांविरुध्द तक्रार केली.
प्रतिनिधि
दिलीप सोनकांबळे