शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला यशस्वीपणे सात वर्ष पूर्ण झाली. या औचित्यावर सेवा दिन म्हणून प्रभाग क्रमांक 13 भारतीय जनता पार्टी व भाजप नगरसेवक कमलताई घोलप व उत्तम केंदळे यांच्या माध्यमातून स्मशानभूमीतील कर्मचारी व अंध व्यक्तींना किराणा वस्तूंचे किट देण्यात आले.
Advertisement
या सेवादिनाचे नियोजन उद्योजक बापू घोलप, युवा मोर्चाचे शहर सचिव आदित्य कुलकर्णी,शहर उपाध्यक्ष प्रशांत बाराथे, युवा मोर्चा प्रभाग अध्यक्ष गिरीश देशमुख, युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष हेमंतजी देवकुळे, युवा मोर्चा अनुसूचित जाती शहर संयोजक सचिनजी उदागे, युवा नेते विजय घोडके, रुपल माने,भिमा पानमंद,कौस्तुभ देशपांडे,संकेत चित्ते, समीर गाडेकर, विशाल केंदळे,कृष्णा घोलप, मयूर घोलप उपस्थित होते.