शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
पिंपळेगुरव येथील राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे युवानेते तानाजी जवळकर यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना पार्श्वभूमीवर परिसरात राहणा-या 5000 कुटुंबास प्रत्येकी अर्धालिटर सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले. यावाटपाचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष मा.संजोग वाघेरे,रा.काॅ.पक्षाचे ज्येष्ठ नेते नगरसेवक मा.विठ्ठल ऊर्फ नाना काटे नगरसेवक मा.राहुलदादा कलाटे मा.नगरसेवक राजेंद्र जगताप मा.शाम जगताप पै.गणेश जगताप मा.अमर आदियाल मा.अंकुश जवळकर मा.बाळासाहेब काशीद मा.दिपकशेठ जवळकर मा.अतुल काशीद मा.दिपक काशीद मा.प्रदिप जवळकर मा.नितीन काशीद मा.नितीन चौधरी व मित्र परिवार उपस्थित होते. तानाजी जवळकर यांनी कोरोना काळात गेल्यावर्षी पासुन गरजूंना अन्रधान्य वाटप, आरसनिक अल्बम गोळ्यांचा वाटप असे अनेक सामाजिक उपक्रम राबवून एक कोविड योध्दा म्हणून काम केले याबद्दल मा.संजोग वाघेरे यांनी त्यांचे कौतुक केले. तर विनामूल्य रुग्णवाहिका प्रथमच पिंपळेगुरव परिसरात उपलब्ध करून देण्यात तानाजी जवळकर यांचे नाव प्रथम येते याची नाना काटे यांनी उपस्थितीतांना आठवण करून दिली. सामाजिक बांधिलकी जपत गोरगरिबांना धान्य वाटप अशाप्रकारची सर्वोतोपरी मदत करण्यासाठी तानाजी जवळकर यांनी सहकार्य केले यांचे काम नागरिकांच्या मनात सदैव आठवणीत राहील असे मत मा.राहुल कलाटे यांनी व्यक्त केले.यावेळी परिसरातील जेष्ठ नागरीक व सर्व सफाई कर्मचारी उपस्थित होते वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून आपल्या परिसरातील नागरीकांच्या स्वास्थ्यासाठी सॅनिटायझर वाटप करून हे आपले कर्तव्य आहे अशी भावना मनात ठेवून कार्य करत असल्याने संजोग वाघेरे यांनी विशेष कौतुक केले. कार्यक्राचे आयोजन तानाजीभाऊ जवळकर सोशल फाउंडेशन तर्फे करण्यात आले. सुत्रसंचालन व आभार दत्ता कदम यांनी केले.