श्रीमंतांसाठी करोडची उधळपट्टी मग गोर गरीब कष्टकरी जनतेसाठी हात अखडला का?
रिक्षचालक,फेरीवाले,घरेलु कमगरसह कष्टकरी जनतेने उठाव केला तर महागात पडेल.
शबनम न्युज / पिंपरी-चिंचवड
रिक्षाचालक, फेरीवाले, धुणीभांडी, स्वयंपाक आदी काम करणाऱ्या कष्टकरी जनतेसाठी तीन हजार रुपये ही अत्यंत तुटपुंजी मदत देण्यासाठी शासनाने मदत केली , नियमात बसत नाही असे कारण सांगून कष्टकरी जनतेचा अवमन करण्याचा प्रयत्न केल्यास हे खपवून घेतले जाणार नाही. कष्टकरी जनतेने उठाव केला तर महागात पडेल असा इशारा कष्टकरी जनता आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी दिला आहे.
पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या वतीने शहरातील रिक्षा चालक,टपरी पथारी, हातगाडी , धुणी-भांडी, स्वयंपाक सह घरकाम करणाऱ्या कष्टकर्यांना तीन हजार रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे.
परंतु ही मदत मिळण्या अगोदरच राजकारण सुरू झाले असून गोरगरिबांच्या प्रश्नावर राजकारण करणे योग्य नाही. हा राजकारणाचा विषय होऊ शकत नाही काबाडकष्ट करणारा गोर गरीब हा स्वाभिमानी आहे, गरीब आहे परंतु लाचार नाही गरीब कष्टकऱ्यांच्या भावनांशी खेळू नका अन्यथा याचे परिणाम भोगावे लागतील .असे देखील बाबा कांबळे म्हणाले ,
यापूर्वी देखील रिक्षाचालकांना बारा हजार रुपये आर्थिक मदत देण्यात आली आहे मग त्यावेळी नियम कोठे गेले होते? पिंपरी-चिंचवड शहर हे कष्टकऱ्यांची नगरी म्हणून ओळखली जाते. या शहराच्या विकासात गोरगरिब कष्टकरी जनतेच्या मोठे योगदान आहे. कष्टकऱ्यांच्या बळावर मोठमोठे मॉल चकचकीत काचेच्या इमारती, वेगवान रस्ते , मल्टिप्लेक्स थिएटर उभे केले गेले .या घटकांना त्याचा वाटा देण्याची वेळ आली तर नियम आठवले या घटकांना त्यांचे हक्कचा विकासातील वाटा मिळाला पाहिजे. वामन दादा कर्डक म्हणतात “सांगा आम्हाला टाटा, बिर्ला ,बाटा कुठे हाय हो, सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठे हाय हो. …
या प्रमाणे आमचा वाटा आम्हाला मिळालाच पाहिजे यासाठी शहरातील रिक्षा चालक, टपरी, पथारी, हातगाडी धारक , घरेलू कामगार महिला यांना आपल्या हक्काचे पैसे मिळवण्यासाठी एकत्र आले पाहिजे असेही यावेळी बाबा कांबळे म्हणाले.