शबनम न्यूज / पिंपरी
आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने संभाजीनगर चिंचवड येथील नोव्हेल इंटरनॅशनल स्कूल च्या प्रांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे ,व नगरसेवक अनुराधा गोरखे यांच्या वतीने व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आला
पाच जून रोजी दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो या निमित्ताने पर्यावरण विषयक अनेक उपक्रम राबविले जातात सध्याच्या स्थितीत कोरोना महामारी मुळे आपल्याला ऑक्सिजन चे महत्व समजले आहे आपण जेवढे जास्त झाडे लावू तेवढेच वातावरण प्रदूषण विरहित असेल पर्यावरणाचे रक्षण आपल्या सर्वांनाच करायचे आहे यानिमित्ताने नोव्हेल इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला अशा भावना नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी यावेळी व्यक्त केल्या
Advertisement