पुणे- मे महिना हा रोटरी युथ सर्विसेस मंथ म्हणून ओळखला जातो. विविध कार्यक्रमांचा समावेश असलेल्या युवा महोत्सवाचे आयोजन रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वती, रोटरी क्लब ऑफ पुणे कॅम्प, रोटरी क्लब पनवेल इलाईट, रोटरी क्लब पुणे वारजे तर संयोजन रोटेक्स 3131 व रोट्रॅक्ट जिल्हा 3131 तर्फे करण्यात आले होते. महोत्सवाची सुरवात विविध स्पर्धात्मक कार्यक्रमाने करण्यात आली. स्पर्धांमधील सर्व विजेत्यांना रोख बक्षिसे देण्यात आली.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘ऑक्सिजन नेक्स्ट’ या वृक्षदानाच्या कार्यक्रमा ने महोत्सवाची सांगता करण्यात आली. पुणे जिल्ह्याच्या रोटरीच्या प्रांतपाल रश्मी कुलकर्णी यांच्या हस्ते रोटरीच्या विविध शाखेतील पदाधिकाऱ्यांना रोपांचे वाटप करण्यात आले. या मधे रोटरी क्लब मगरपट्टा सिटी व रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वती या दोन क्लब चा सहभाग होता. एका क्लबने झाडांची सोय केली होती तर एका क्लबने वाहतूक व्यवस्था केली होती. पाच हजार रोपांचे वाटप आत्तापर्यंत करण्यात आले असून या रोपांचे रोटरीच्या विविध शाखांमार्फत शहरातील विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
रोटरी जिल्हा 3131 युवा चे संचालक वसंतराव मालुंजकर, आर. वाय. ई. संचालक अशोक भंडारी, एन.जी.एस. ई. संचालक नीरज मेहता, रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वती च्या अध्यक्षा माया फाटक, रोटरी क्लब ऑफ पुणे कॅम्प च्या अध्यक्षा अश्विनी शहा, रोटरी क्लब पनवेल इलाईट चे अध्यक्ष आशिष मेहता , रोटरी क्लब ऑफ पुणे वारजे चे अध्यक्ष विनायक पाटील, रोट्रॅक्ट जिल्हा 31 31 च्या जिल्हा रोट्रॅक्ट प्रतिनिधी श्रद्धा लामखडे, रोटॅक्स चे अध्यक्ष खुश संघवी व विविध रोटरीच्या शाखेचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.