शबनम न्युज / पिंपरी
युवा सेना प्रमुख पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अजिंक्य रामभाऊ उबाळे व शिवसेना, युवासेना वतीने वृक्षमित्र पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वृक्षमित्र पुरस्काराकरिता सहभागी होण्यासाठी स्वतःच्या घरात छोट्या जागेत ही ज्यांनी वृक्ष संगोपन केले आहे, अशा व्यक्तींना सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे. ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने होणार असून स्पर्धकांनी आपल्या घरगुती टेरेस, बागेचा व्हिडिओ किंवा फोटो किंवा सेल्फी दिलेल्या व्हाट्सअप नंबर वर पाठवावे, असे आवाहन संयोजक अजिंक्य रामभाऊ उबाळे यांनी केले आहे.
सदर स्पर्धा 12जुन ते 17 जून दरम्यान होणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी, वृक्ष प्रेमींनी, निसर्ग मित्रांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन अजिंक्य उबाळे यांनी केले आहे.
संपर्क – 73 87 63 59 99 व 73 87 99 13 60