शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी-चिंचवडमध्ये साकारत असलेल्या “संविधान भवनाच्या” कामाला गती मिळावी म्हणून भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आज नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी विभागीय आयुक्त कार्यालयास निवेदन दिले.
दिलेल्या निवेदनात कुंदन गायकवाड यांनी म्हंटले आहे कि, शहरात संविधान भवन आकाराला यावे यासाठी आमदार महेशदादा लांडगे यांनी मोठा पाठपुरावा केला आहे. आमदार महेशदादांच्या संविधान भवनाच्या मागणीला महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व प्राधिकरणाचे तत्कालीन अध्यक्ष श्री सदाशिव खाडे सर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लगेचच पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक ५ व ८ मधील मोकळया भूखंडावर “संविधान भवन”उभारणी करणे 10 एकर जागा नियोजीत करून अर्थसंकल्पामध्ये ५ कोटी रूपयांची तरतूद केली होती. नुकताच पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे “पीएमआरडीए” मध्ये विलीनीकरण झाले आहे. या निर्णयामुळे संविधान भवनाचा प्रकल्प रेंगाळण्याची शक्यता आहे. असे ही दिलेल्या निवेदनात नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी म्हंटले आहे.
यावेळी विभागीय आयुक्तांची भेट न झाल्यामुळे उपायुक्त प्रतापराव जाधव यांना निवेदन देण्यात आले. त्यांच्या समवेत नगरसेवक विकास डोळस, सामाजिक कार्यकर्ते रमेश खरात,तसेच अंकुशशेठ मळेकर, संदिप शेलार,हेमंत भोसले,किरण डोळस उपस्थित होते.