शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी युवासेनेच्या वतीने नवनिर्वाचित युवासेनेच्या पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.या वेळी मावळ युवासेनेचे विस्तारक राजेश पळसकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, संघटनात्मक बांधणी करून येणाऱ्या महानगरपालिकेला सामोरे जायचे. व तसेच नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अग्रेसर राहायचे.
ज़िल्हा सन्मवयक अनिकेत घुले म्हणाले की “गाव तिथं शाखा आणि शाखा तिथं युवासैनिक “असे धोरण अवलंबून तरुण मतदार युवासेनेकडे जास्तीत जास्त आकर्षित करून त्यांना सदस्य करून घ्यायचे.
पिंपरी चिंचवड युवासेना शहरप्रमुख विश्वजीत बारणे म्हणाले की, संघटनाच्या नावाला गालबोट न लागता सर्वांनी मिळून काम करायचे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत येणाऱ्या निवडणूक मध्ये जास्तीत जास्त युवासेनेचे नगरसेवक निवडून आणायचे
या वेळी नवनिर्वाचित पद अधिकारी, सन्मवयक रुपेश कदम, माऊली जगताप, सागर शिंदे, मकरंद कदम , ओंकार जगदाळे, बापू चव्हाण,प्रज्वल दिघे,साहिल लोंढे,पराग दिघे,साहिल लोंढे, आशिष बाबर, पुष्पक चव्हाण ह्यांचे सत्कार करण्यात आले.पिंपरी युवासेनाचे पिंपरी विधानसभा सन्मवयक रवी नगरकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमचे आयोजन पिंपरी युवासेना अधिकारी निलेश हाके यांनी केले होते.
तसेच रवी गोडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला, पंचतारा नगर, गंगा नगर, गुरुदेव नगर ,क्रांति नगर परिसर मध्ये वटपौर्णिमेनिमित्त महिला भगिनींना तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आले,
तसेच रवी घोडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू नागरिकांना छत्री तसेच फेरीवाले भाजी फळ विक्रेते यांना रेनकोट वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे सिख धर्म गुरु हरगोविंद सिंह जी जयंती निमित्त आकुर्डी गुरुद्वारा येथे धान्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला तसेच पोलीस बांधवांसाठी अत्याधुनिक व्यायाम साहित्य आणि वॉटर प्युरिफायर भेट म्हणून देण्यात आले.