शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरात अनेक जण आपला वाढदिवस साजरा करतात काही जण वाढदिवसाचे औचित्य साधून अनेक सामाजिक उपक्रम राबवितात, आकुर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते रवी गोडेकर यांनी आपला वाढदिवस साजरा करत असताना या वाढदिवसानिमित्त ज्या लहान मुलांचे मायेचे छत्र हरपले आहेत अशा अनाथ मुलांचे रवी गोडेकर यांनी पालकत्व स्वीकारून शैक्षणिक जबाबदारी स्वीकारली आहे ,
तसेच रवी गोडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला, पंचतारा नगर, गंगा नगर, गुरुदेव नगर ,क्रांति नगर परिसर मध्ये वटपौर्णिमेनिमित्त महिला भगिनींना तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आले,
तसेच रवी घोडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू नागरिकांना छत्री तसेच फेरीवाले भाजी फळ विक्रेते यांना रेनकोट वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे सिख धर्म गुरु हरगोविंद सिंह जी जयंती निमित्त आकुर्डी गुरुद्वारा येथे धान्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला तसेच पोलीस बांधवांसाठी अत्याधुनिक व्यायाम साहित्य आणि वॉटर प्युरिफायर भेट म्हणून देण्यात आले.