शबनम न्युज / पिंपरी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी घेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील अभ्यासाचा समावेश करण्यात आला आहे. या निर्णयाचे पिंपरी-चिंचवड शहरातील नगरसेवक वसंत बोराटे यांनी स्वागत केले आहे.
छत्रपती शिवरायांवर ‘डिप्लोमा कोर्स
अवघ्या महाराष्ट्राचे प्रेरणा स्थान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ! त्यांनी केलेले कार्य आणि त्यांची युद्धनीती एक अभ्यासाचाच विषय आहे. एक आनंदाची बातमी अशी की , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदविकेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील अभ्यासाचा समावेश होणार आहे . या अभ्यासक्रमाचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज: व्हिजन अँड नेशन बिल्डिंग ‘ असे आहे.
यामध्ये महाराजांचे ‘युद्धशास्त्र आणि युद्धनीती ‘, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार’ आणि ‘प्रशासन ‘ असे अनेक विषय यात शिकवले जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी सुद्धा अर्थ व्यवस्था कशी भक्कम ठेवली , लोककल्याणासाठी राबवलेल्या अनेक योजना त्यांनी कशा अंमलात आणल्या या सगळ्या गोष्टी खरोखरच अभ्यास करण्यासारख्या आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतलेल्या या निर्णयाचे अगदी मनापासून स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारख्या राष्ट्रीय पुरुषांवरील अभ्यासक्रम अभ्यासणे सध्याच्या काळाची गरज आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा हा एक वर्षाचा पदव्युत्तर पदविका (पी जी डिप्लोमा ) असणार आहे. १४ जून पासून या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ४ जुलै आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा अभ्यासक्रम ऑनलाईन प्रक्रियेने होणार आहे!