शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या विद्यमान नगरसेविका विनया प्रदीप तापकीर यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रभागातील 8 हजार नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड मोफत मिळाले आहे. नगरसेविका विनया प्रदीप तापकीर व सामाजिक कार्यकर्ते प्रदीप तापकीर यांनी आयुष्यमान भारत कार्ड मिळविण्यासाठी एक उपक्रम हाती घेतला होता.
दिनांक 15 जून ते 30 जून दरम्यान नागरिकांचे आधार कार्ड, रेशन कार्ड अशी आवश्यक असलेली कागदपत्रे घेऊन विनया प्रदीप तापकीर यांच्या जनसंपर्क कार्यालयात उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत आठ हजार नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड मोफत मिळाले आहे. या आयुष्यमान भारत कार्ड चा नागरिकांना मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने 300 प्रकारच्या सर्जिकल व मेडिकल उपचार तसेच खाजगी व सरकारी हॉस्पिटलमध्ये सुविधा त्याचप्रमाणे 5 लाख रुपये प्रति वर्षी विमा संरक्षण अशा सुविधा मिळणार आहेत. आयुष्यमान भारत कार्ड हे नागरिकांना मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनी नागरिक नगरसेविका विनया तापकीर यांचे आभार व्यक्त केले आहे .