शबनम न्यूज / चिंचवड
चिंचवड येथे विषय एक पात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन कै. वसंतराव जोशी नाट्य संस्थेच्या वतीने येत्या रविवार (दि.11 जुलै 2021) रोजी करण्यात आले असल्याची माहिती कै. वसंतराव जोशी नाट्य संस्था चिंचवड अध्यक्ष मदन जोशी यांनी दिली आहे.
ही स्पर्धा चिंचवडच्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेत दुपारी 1 ते 4 या वेळेत होणार आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी वयाची अट नाही. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Advertisement
स्पर्धेच्या दिवशी स्पर्धा संपल्यावर 1 तासांनी बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. असे संस्थेचे अध्यक्ष मदन जोशी यांनी सांगितले.