भारतीय चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते दिलीप कुमार उर्फ मोहम्मद युसूफ खान यांचे आज सकाळी साडेसात वाजता मुंबई येथील हिंदुजा हॉस्पिटल येथे निधन झाले 98 वर्षाचे दिलीप कुमार यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 रोजी पाकिस्तान येथील पेशावर मध्ये झाला होता 1940 च्या दशकापासून त्यांनी आपल्या अभिनयाला ज्वार भाट या चित्रपटद्वारे सुरुवात केली राज कपूर दिलीप कुमार देवानंद या तिघांनी एक काळ गाजवला दिलीप कुमार नव्वदच्या दशकापर्यंत अभिनयात सक्रिय राहिले वयस्कर झाल्याने काही दिवसापासून त्यांची तब्येत बिघडली होती बऱ्याच दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते या उपचारा दरम्यान आज सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली चित्रपट सृष्टीत ट्रॅजेडी किंग म्हणून प्रसिद्ध असणारे दिलीप कुमार यांचा मोठा चाहता वर्ग भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात आहे
Advertisement