शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी येथील उड्डाणपुलाचे काम अपूर्ण असतानाही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी उद्घाटन करून वाहतुकीसाठी खुला केला याच पुलावर अपघात झाल्याने राष्ट्रवादीच्याच माजी नगरसेवकाच्या पुतण्याचा मृत्यू झाला या मृत्यूला सर्वस्वी महापालिका अधिकारी आणि काम अपूर्ण असताना पुलाचे उद्घाटन करणारे राष्ट्रवादीचे पदाधिकारी जबाबदार आहेत असा आरोप पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सत्तारूढ पक्ष नेते नामदेव ढाके यांनी पत्रकार परिषदेत केला
निगडी येथील उड्डाणपुलावर रात्रीच्या वेळी दुचाकी व चारचाकी वाहनांमध्ये भीषण अपघात झाला या अपघातात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक तानाजी खाडे यांच्या पुतण्याची निधन झाले तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघाताला महापालिका अधिकाऱ्यांबरोबर राष्ट्रवादीचे पदाधिकारी जबाबदार असल्याची टीका भाजपने केली आहे नामदेव ढाके यांनी यावेळी सांगितले की पुलाचे बरेच एक काम बाकी आहे, दिशादर्शक फलक लावणे ,रस्त्यावर पांढरे पट्टे मारणे, वीज दिव्यांची सोय करणे आदी कामे बाकी आहेत दिशादर्शक फलक नसल्याने अंदाज येत नाही त्यामुळे काम पूर्ण झाल्याशिवाय पुलाचे उद्घाटन सत्ताधारी भाजप वतीने करण्यात येत नव्हते मात्र श्रेय लाटण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी या पुलाचे उद्घाटन केले हे योग्य नाही.