शबनम न्युज | वडगाव मावळ
वडगाव मावळ | प्रतिनिधी
राष्ट्रवादी महीला काँग्रेस व कुलस्वामिनी महिला मंच यांच्या वतीने सन्मान महीला कोरोना योध्दांचा या कार्यक्रमाचे आयोजन वडगावला भेगडे लाँन्स येथे करण्यात आले. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी महीला प्रदेश अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, आमदार सुनिल आण्णा शेळके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात राष्ट्रवादी महीला काँग्रेस व कुलस्वामिनी महिला मंच यांच्या वतीने अंगणवाडी सेविका, आशा सेविका, महीला पोलिस, पाटील डॉक्टर, सफाई कर्मचारी तसेच अनेक क्षेत्रांत आपले कर्तव्य बजावणार्या सर्व महीलाना कोरोना योध्दा असे सन्मानित करण्यात आले.
यावेळी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुवर्णा राऊत , कुलस्वामिनी महिला मंचच्या अध्यक्षा सारीकाताई शेळके ,पिडीसी बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे मंजुताई वाघ, सुनिता काळोखे, शितल हगवणे, रुपाली दाभाडे, मा उप नगराध्यक्ष वैशाली दाभाडे वडगाव नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पुजाताई वहीले व लोणावळा, तळेगाव वडगाव नगरपरिषदेच्या नगरसेविका, महीला पदाधिकारी आणी तालुक्यातील जेष्ठ श्रेष्ठ नेते गण मोठ्या संख्येने उपस्थित होते.