दिघी प्रभाग क्रमांक चार परिसरात 27 जुलै रोजी जन्माला येणार्या बालकांच्या नावे 5555 रुपयांची एफडी
शबनम न्यूज | पिंपरी
दिघी | बातमीदार
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. या पार्श्वभूमीवर दिघी परिसरातील शिवसेनेचे संतोष तानाजी वाळके यांच्या वतीने अभिनव उपक्रम घेण्यात येत आहे. 27 जुलै रोजी दिघी प्रभाग क्रमांक चार परिसरात जी बालके जन्मास येतील त्यांच्या नावे शिवसेने तर्फे 5555 रुपयांची एफडी करण्यात येईल अशी घोषणा या प्रभागातील शिवसैनिक संतोष तानाजी वाळके यांनी केली आहे.
दिघी प्रभाग क्रमांक चार मधील नवजात जन्मलेल्या बालकाच्या पालकांनी बालकाचा जन्माचा पुरावा शिवसेना जनसंपर्क कार्यालय दिघी येथे जमा करावा असे आवाहन संतोष तानाजी वाळके यांनी केले आहे.