कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस दिले मानधन
शबनम न्यूज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी तसेच त्यांच्या पत्नी नगरसेविका सौ शीतल काटे यांनी आपल्या एक महिन्याचे मानधन कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस दिले आहे
त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांना पत्राद्वारे विनंती केली आहे की महाराष्ट्रातील कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील भागात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे यामध्ये ,अनेक नागरिकांचे संसार उध्वस्त झाले, दुकान, शेती,व्यवसाय पाण्याच्या पुरामुळे वाहून गेले तर काही ठिकाणी दरड कोसळून जीवितहानी झाली ,कधीही न भरून निघणारे असे नुकसान आहे , महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार व खासदार यांचे एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचे जाहीर आवाहन केले आहे, तसेच आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो हीच बाब विचारात घेऊन मी व माझी पत्नी आमचे दोघांचे पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतर्फे मिळणारे एक महिन्याचे मानधन कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधी देण्यात यावे अशी विनंती केली आहे
तसेच शहरातील सर्वपक्षीय नगरसेवकांनी आपले एक महिन्याचे मानधन पूरग्रस्तांसाठी द्यावे असे आवाहन नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी केले आहे