शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
युवा नेतृत्व राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिं.चिं.शहर कार्याध्यक्ष निहाल आझमभाई पानसरे यांचा वाढदिवस पिंपरी येथील सावली निवारा केंद्र येथे केक कापून व गरजू निराधारांना फळे आणि बिस्किटे वाटप करून साजरा करण्यात आले. तसेच आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस शहर उपाध्यक्ष अकबर मुल्ला, व्यवस्थापन सेल अध्यक्ष शक्रुल्ला पठाण व शहर अल्पसंख्याक सेल सरचिटणीस साहूल उर्फ हमीद शेख यांनी केले होते.
हि बातमी पण वाचा - "आरएचपी क्लिनिक"ची दुसरी शाखा आता औरंगाबाद मध्ये सुरु
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष संजोगवाघेरे पाटील, मा.शिक्षण मंडळ सभापती फझलभाई शेख, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, युवक प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, अल्पसंख्याक सेल कार्याध्यक्ष हबीबभाई, युवक उपाध्यक्ष प्रसाद कोलते, पदवीधर कार्याध्यक्ष युनुस शेख, अशपाक शेख , नबील पानसरे, व कार्यकर्ते उपस्थित होते.