शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
निगडी प्राधिकरण येथे झालेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त, अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या वेळेस राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मयूर भरत जाधव यांच्या संकलपनेतून आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना रायटिंग पॅड चे वाटप करण्यात आले.
हि बातमी पण वाचा -Pimpri : युवानेते निहाल पानसरे यांचा वाढदिवस गरजुंना फळे आणि बिस्किटे वाटप करून साजरा
यावेळी प्रमुख उपस्थिति पि.चि. राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष संजोग वाघेरे(पाटिल), पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल वाकडकर , प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर,पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष संदीपान झोम्बाडे, पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष योगेश गवळी, शाम जगताप .चिंचवड विधानसभा अध्यक्ष कुणाल थोपटे, पिंपरी विधानसभा अध्यक्ष शेखर काटे,तसेच संतोष अण्णा वाघेरे, पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रसाद कोलते, निलेश निकाळजे, विशाल पवार, प्रशांत सपकाळ, सरचिटणीस प्रतीक साळुंखे, तुषार ताम्हाणे, सागर राजगुरू, योगेश जाधव, शुभम अडागळे,सुरेंद्र सुरोशे आदी उपस्थित होते.