भक्ती शक्ती पूलाविषयी भाजप युवा मोर्चा प्रभाग क्रमांक १३ च्या मागणीचा विचार
शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
नव्याने चालु करण्यात आलेला भक्ती-शक्ती पुल, उद्या पासून १० दिवस सुरक्षेच्या दृष्टीने राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
हि बातमी पण वाचा -Pimpri : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना रायटिंग पॅड चे वाटप
सतत अपघातांचा धनी बनलेला भक्ती शक्ती पुल, सुरक्षेच्या दृष्टीने राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी व अजून कोणाचा बळी जाऊ नये म्हणून वाहतुकीस बंद करावा व स्पीड ब्रेकर्स, दिशा दर्शक अशी राहिलेली कामे १००% पूर्ण करूनच वाहतूकीसाठी परत खुला करावा अशी मागणी १५ जुलै रोजी भाजप युवा मोर्चा प्रभाग क्रमांक १३ अध्यक्ष गिरीष देशमुख, नगरसेवक प्रा उत्तम केंदळे, युवा मोर्चा सरचिटणीस आदित्य कुलकर्णी, युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष प्रशांत बाराथे व इतर युवा मोर्चा पदाधिकारी यांनी केली होती, त्याची दखल घेत आज पालिके तर्फे व सन्माननीय महापौर सौ. माई ढोरे यांच्या वतीने पुलाची पाहणी करण्यात आली व महापौरांच्या आदेशानुसार पुल उद्या (३ ऑगस्ट) पासून मधला भाग म्हणजे रोटरी वाहतुकीस बंद करून येत्या १० दिवसात राहिलेलं काम पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही पालिका अधिकारी व बी जी शिर्के कन्स्ट्रक्शन कडून देण्यात आली.