शबनम न्युज | पिंपरी
रावेत | प्रतिनिधी
इयत्ता दहावी व बारावी चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे या निकालात पिंपरी-चिंचवड शहरातील किवळे, विकास नगर परिसरातील ज्या दहावीच्या विद्यार्थ्यांना 80 ते 90 टक्के गुण मिळाले आहे त्यांना दहा हजार रुपये व इयत्ता दहावी मध्ये 90 टक्के पेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना पंधरा हजार रुपये तसेच इयत्ता बारावी मध्ये 80 टक्के पेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना .१०००० रुपये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अर्थसहाय्य योजनेतून मिळणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी मार्कलिस्ट झेरॉक्स अथवा ऑनलाईन रिझल्ट प्रिंट 31 ऑगस्टपर्यंत राजेंद्र बाळासाहेब तरस यांचे जनसंपर्क कार्यालय शिवम भवन, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ,विकास नगर येथे जमा करावे असे आवाहन पिंपरी चिंचवड शहर शिवसेना युवा सेना उपशहर अधिकारी राजेंद्र तरस यांनी केली आहे