शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
भोसरी | प्रतिनिधी
भोसरी महावितरण विभागातील वीजपुरवठा सुरळीत करावा तसेच महावितरण अंतर्गत येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात अन्यथा जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादीचे नगरसेवक संजय वाबळे यांनी महावितरण विभागाला दिला आहे,
दिलेल्या पत्रात संजय वाबळे यांनी नमूद केले आहे की पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी महावितरण विभाग अंतर्गत येणाऱ्या इंद्रायणीनगर पेठ क्र. १, २, ३, ४, ६, ७, ९, १०, ११, १३ गवळीमाथा, गणेशनगर, लांडगेनगर, गुरुविहार कॉलनी, जय गणेश साम्राज्य, खंडेवस्ती या रहिवासी भागातील व महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रातील J, S, EL ब्लॉक भागात मागील काही महिन्यांपासून दिवसातून अनेकदा विद्युत पुरवठा खंडित होतो. मात्र त्याची दुरुस्ती बऱ्याचवेळा २-३ दिवस होत नाही. त्यामुळे नागरिक व उद्योजक यांना नाहक त्रास होत आहे. तसेच आपल्या विभागाकडून विद्युत पुरवठा खंडित प्रसंगी तात्काळ केबल जोडणी, फिडर पिलर दुरुस्ती, नवीन केबल टाकणे, ट्रान्सफार्मर दुरुस्ती, मिनी बॉक्स दुरुस्ती, संरक्षक जाळी व कॅपिंग इ. कामे या विषयी सतत पत्रव्यवहार व पाठपुरावा करून देखील या तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
तरी सदरची कामे तात्काळ मार्गी लावण्यात यावी अन्यथा आम्हांला जनआंदोलन करावे लागेल याची गांभीर्याने नोंद घ्यावी.असे हि संजय वाबळे यांनी सांगितले आहे.