शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
भोसरी । प्रतिनिधी
मागील दहा पंधरा दिवसापूर्वी आयुक्त पिंपरी चिंचवड मनपा यांनी अनेक अधिकार्यांच्या बदल्या केल्या.
त्यातच प्रभाग क्रमांक पाच गवळी नगर मधील उपअभियंते सचिन कुतवळ यांची बदली करण्यात आली .
खरेतर उपअभियंता कुतवळ यांची नियुक्ती दीड वर्षापूर्वीच क्षेत्रीय कार्यालयात झालेली आहे मग त्यांची बदली करण्याचे नेमके कारण काय हे मात्र नगरसेविका प्रियांका बारसे यांना समजलेले नाही
ऐन पावसाळ्यात बदली झाल्याने व ड्रेनेज चोकअपसारख्या तक्रारी नागरिकांकडून वारंवार येत असल्यामुळे नागरिकांच्या रोषाला प्रियांका बारसे यांना सामोरे जावे लागत आहे.
शिवाय अचानक या ठिकाणी नवीन व्यक्ती आल्यानंतर त्यांना प्रभागातील जलनिस्सारण विभागाच्या खाचाखोचा माहित नसतात त्यांना काम समजून देण्यासही अवघड जाते तसेच वेळही जातो ही अडचण लक्षात घेऊनच दीड वर्षापूर्वीच नियुक्त झालेले उपअभियंता सचिन कुतवळ यांची ई क्षेत्रीय कार्यालयातच परत नियुक्ती करावी अशी मागणी नगरसेविका प्रियंका. बारसे यांनी आयुक्तांकडे केली आहे .
खरंतर मागिल आठवड्यातच नगरसेविका प्रियांका बारसे यांनी फोनवरून संपर्क साधून आयुक्तांना हे पद रिक्त असल्याची माहिती दिली होती तथापि अद्याप पर्यंत आयुक्तांकडून यावर कोणाचीही नियुक्ती झालेली नाही.