महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण व प्रेक्षणीय स्थळ असून, येथे पर्यटक वर्षभर भेट देतात. ब्रिटिश काळापासून महाबळेश्वराला लाभलेला उत्कृष्ट गिरीस्थान हा लौकिक आजही कायम आहे. समुद्रसपाटीपासून १,३७२ मीटर उंचीवर पश्चिम घाटांच्या रांगेत वसलेले महाबळेश्वर हे थंड हवेचे व सहलीचे निसर्गरम्य ठिकाण आहे. महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे ठिकाण आहे.हे आतिशय थंड हवेचे ठिकाण आहे.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे एक नगरपालिका असणारे तालुक्याचे शहर आहे. सह्याद्री पर्वताच्या पश्चिम घाटातील उंच डोंगरावर हे वसलेले शहर आहे. भारतातील जी हिरवळीने सजलेली काही मोजकीच ठिकाणे आहेत. त्यातीलच हे एक ब्रिटिश राजवटीतील मुंबई परगण्याची उन्हाळ्यातील राजधानी होती, याचे क्षेत्रफळ १३७.५१ किमी.(५२.९५, स्क्वे.मीटर) आहे. समुद्रसपाटीपासून याची उंची १३५३ मीटर(४४३९ फुट) आहे. सन २०११ चे शिरगणतीनुसार याची लोकसंख्या १२७३७ आहे.
कृष्णा, कोयना, गायत्री, सावित्री, वेण्णा, सरस्वती, आणि भागीरथी या ७ नद्यांचे उगमस्थान आहे की जे पाहिलेच पाहिजे. यापैकी पहिल्या पांच नद्यांचा ओहोळ सतत बाराही महिने वहात असतो. सरस्वतीचा ओहोळ मात्र प्रत्येक ६० वर्षानी दर्शन देतो. आता तो २०३४ साली दर्शन देईल. भागीरथीचा ओहोळ प्रत्येक १२ वर्षानी दर्शन देतो. हा आता सन २०१६ मध्ये मराठी श्रावण महिन्यात दर्शन देईल. हे मंदिर ४५०० वर्षापूर्वीचे आहे. येथून बाहेर पडल्यानंतर कृष्णा नदी स्वतंत्र वाहाते. येथे कृष्णाबाई हे स्वतंत्र मंदिर आहे.
पंचगंगा मंदिराचे पाठीमागे अगदी जवळच कृष्णाबाई नावाचे मंदिर आहे की जेथे कृष्णा नदीची पूजा केली जाते. हे सन १८८८ मध्ये कोकणचे राजे ‘रत्नगिरीओण’ यांनी उंच टेकडीवर बांधले की जेथून पूर्ण कृष्णा दरी पाहता येते. या मंदिरात शिव लिंग आणि कृष्णाची मूर्ती आहे. लहानसा ओहोळ गोमुखातून वाहतो आणि तो पाण्याच्या कुंडात पडतो. पूर्ण मंदिराचे छतासह दगडी बांधकाम हे विशेष वैशिष्ट्य आहे. या मंदीराजवळ दलदल झालेली आहे आणि नाशवंत स्थितीत आहे. येथे पर्यटक फार कमी येतात त्याने ते एकटे पडलेले आहे. पण या ठिकाणाहून अतिशय सुंदर असा कृष्णा नदीचा देखावा पाहता येतो.
या ठिकाणाला हे नाव दिलेले आहे त्याला कारण असे की नैसर्गिक रित्या येथे तीन दगड आहेत ते मंकी सारखे समोरासमोर बसलेले आहेत असे वाटते आणि गांधीजींच्या शब्दांची आठवण करून देतात. तेथील खोल दरीत डोकावले की एका मोठ्या पाशानात ३ हुशार मंकी समोरासमोर बसलेले आहेत असे चित्र नजरेला दिसते. आर्थर सीट पॉइंटला जान्याच्या मार्गावर हा पॉइंट आहे.
समुद्र सपाटीपासून १,३४० मीटर उंचीवर असलेला हा महाबळेश्वरमधील एक पॉइंट आहे. सर आर्थर यांच्या नावामुळे या जागेला हे नाव मिळाले. अतिशय नैसर्गिक देखाव्यासाठी हे स्थान प्रसिद्ध आहे.हे एक सुंदर ठिकाण आहे.खाली खूप खोल दरी आहे.
महाबळेश्वर हे विश्रांतीचे ठिकाण व सहलीचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. वेन्ना लेक हे पर्यटकांसाठी महाबळेश्वर मधील प्रमुख आकर्षक ठिकाण आहे. हे लेक सर्व बाजूंनी हिरव्यागार झाडांनी वेढलेले आहे. तेथून तुम्ही लेकचा देखावा नजरेत सामाऊ शकता किंवा प्रसिद्ध बाजारपेठेत राहूनही आनंद घेऊ शकता.
महाबळेश्वरचे पूर्व बाजूस हा पॉइंट आहे. येथून तुम्ही बलकवडी आणि धोम धरणांचा देखावा पाहू शकता. या पॉइंटची ऊंची साधारण १२८० मीटर आहे.
काटे पॉइंट जवळच हा निडल पॉइंट आहे. नैसर्गिक रित्या खडकाला सुईसारखे भोक आहे ते सहजतेने दिसते म्हनून त्याला नीडल होल नाव दिलेले आहे. हा पॉइंट हत्तीच्या सोंडेसारखा दिसतो म्हणून त्याची डेक्कन ट्रप म्हणून ही प्रसिद्धी आहे.
सर लेस्ली विल्सन हे सन १९२३ ते १९२६ मध्ये मुंबईचे राज्यपाल होते तेव्हा या पॉइंटला त्यांचे नाव दिले आहे. महाबळेश्वर मधील हा १४३९ मी.ऊंचीचा सिंडोला टेकडीवरील सर्वात उंच पॉइंट आहे. महाबळेश्वर मधील हा एकच पॉइंट असा आहे की, येथून तुम्ही सूर्योदय आणि सूर्यास्तही पाहू शकता. महाबळेश्वरचे सर्व दिस्यांची आकर्षकता तुम्ही येथून न्याहाळू शकता. महाबळेश्वर मेढा मार्गाच्या पाठीमागील बाजूस हा विल्सन पॉइंट महाबळेश्वर शहरापासून १.५ की.मी. अंतरावर आहे.