शबनम न्युज | पिंपरी / पुणे
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
बोपखेल फाटा ते गणेशनगर ह्या रस्त्याचे रुंदीकरण व्हावे यासाठी आज युवासेनेच्या वतीने पिंपरी-चिंचवड मनपाचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांना निवेदन देण्यात आले.
सन २००८ मध्ये पिंपरी-चिंचवड मनपाने भारत सरकारला बोपखेल फाटा ते गणेशनगर ह्या रस्त्याच्या रुंदिकरणाचा प्रस्ताव पाठवाल होता, त्या अनुषंगाने भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयाने हा प्रस्ताव दिनांक १६ एप्रिल २००९ रोजी मान्य केला, त्याचे पत्रक क्रमांक १३०/९/११ २००३ड, भारत सरकारने कामांची मंजुरी व मोजणी साठी पिं-चिं.मनपाला परवानगी दिली होती,त्यानुसार १०३०६.८८ चौ.मिटर क्षेत्र व १.०३ किलोमीटर पल्ल्याचे रुंदीकरण होईल असा अहवाल पिं.चिं.मनपाने रक्षा विभागाला दिला, १०३०६.८८ चौ.मीटर जागेचे मुल्य ३०९२०६४० रुपये मोबदला म्हणुन भारत सरकारला देण्यात येणार होता, परंतु पालिकेने आजतागायत ह्या विषयावर काहिही काम केलेले नाहीये.
१२ वर्षांचा काळ उलटून गेला आहे बोपखेल गावचा लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे, त्यात बोपखेल-दापोडी रस्ता बंद झाला आहे, बोपखेल-खडकी पुलाचे काम अद्यापही अर्धवट अवस्थेतच बंद पडले आहे,परिणामी सर्व भार बोपखेल फाटा-गणेशनगर-रामनगर-बोपखेल ह्या रस्त्यावर आला आहे, त्यामुळे येथे रोजच वाहतुकीचा खोळंबा होत आहे,अपघाताचे प्रमाण वाढले आहे, पादचारी लोकांना स्वतंत्र ट्रॅक नाहीये, दुसरा कोणताही पर्याय नसल्याने पादचारी जीव मुठीत धरुन वाहतुकीच्या रस्त्याने चालत प्रवास करत आहेत,ह्या सर्व बाबी व बोपखेल, रामनगर,गणेशनगर मधील ग्रामस्थांची कैफियत आज अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे साहेब ह्यांच्या समोर पिंपरी विधानसभेच्या युवतीसेनाप्रमुख प्रतिक्षा घुले ह्यांनी मांडली. यासमयी पिंपरी-चिंचवड युवासेनेचे प्रमुख विश्वजीत बारणे, शहर समन्वयक रुपेश कदम, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण घुले, विधानसभा प्रमुख निलेश हाके, माऊली जगताप, राजेंद्र तरस, सनी कड, अविनाश जाधव, आर.डी.गिल उपस्थित होते.
लवकरात लवकर बोपखेल फाटा ते गणेशनगर रस्ता रुंदीकरणाच्या समस्येचे निराकरण करु असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त साहेबांनी दिले.